Coconut Oil

नारळाच्या तेलाचे फायदे – Khobrel Telache Fayde 1) सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल सर्वोत्तम नरमाई देणाऱ्या क्रीमप्रमाणे काम करते, विशेष करून कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल अमृता प्रमाणे असते. आपल्या कोरड्या त्वचेला मुलायम करण्यामध्ये नारळाचे तेल सहायक ठरते. आंघोळीच्या 20 मिनीट पहिले नारळाच्या तेलास आपल्या शरीरावर लावावे आणि नंतर याला हिरव्या हरभऱ्याच्या पिठाच्या सहाय्याने धुवून घ्यावे. कधीही शरीरावर जास्तीत जास्त साबणाचा उपयोग करू नये कारण साबणामुळे शरीराची नरमाई कमी होत जाते. 2) नारळाच्या थंड्या तेलाचा उपयोग आम्ही लहान बाळाची मसाज करण्याच्या तेलाच्या रूपात सुद्धा करू शकतो. 3) नारळाचे तेलास दलिया मध्ये मिसळून तुम्ही त्याला जेंटली फेसिअल स्क्रब प्रमाणे उपयोग करू शकता. 4) नारळाच्या तेलास आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळल्याने आपले शरीर नरम राहील. 5) नारळाचे तेल कोरडी त्वचा आणि घामोळ्यासाठी सुद्धा सहायक ठरते. ह्यामुळे आपल्या शरीराच्या घामोळ्या सुद्धा दूर होतील. 6) नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही केवळ एक softness देणाऱ्या क्रीमप्रमाणेच नाही तर लोशन प्रमाणे सुद्धा वापर करू शकता. नारळाचे तेल रोज वापरल्याने तुम्ही आपल्या डोळ्यांच्या समस्या सुद्धा दूर करू शकता. 7) नारळाच्या तेल तुमच्या ओठांना सर्वात आकर्षित सुद्धा बनवू शकते, तुम्ही आपल्या कोरड्या-सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावू शकता. 8) नारळाच्या तेलास तुम्ही मेकअप रिमूवर प्रमाणे सुद्धा उपयोग करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील किंवा डोळ्यावर लावलेले मेकअप सहजपणे काढू शकता. 9) नारळाच्या तेलाचा दैनंदिन उपयोग केल्याने तुम्ही रोज़ विविध खतरनाक आजारापासून वाचू शकता. 10) नारळाचे तेलामध्ये अदभूत नैसर्गिक शक्ति असते, नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांच्या समस्येला सुद्धा दूर करू शकता. तुम्ही त्याला डोक्याच्या त्वचेवर लावू शकता. लावल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत त्याला लावलेले राहू द्या आणि नंतर शैम्पू च्या सहाय्याने आपल्या डोक्याला धुवून घ्या. 11) नारळाचे थंड्या तेलाचे काही थेंब रोज़ तुम्ही रोज तुमच्या डोक्यातही टाकू शकता आणि उपयोग करू शकता. 12) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या बोटांची मसाज सुद्धा करू शकता. ज्यामुळे तुमचा रक्त प्रसार सुद्धा सुरळीत होईल आणि आपल्या आरोग्यावर काहीच प्रभाव पडणार नाही. 13) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या टाचेला फुटण्यापासून सुद्धा वाचवू शकता. नारळाचे तेल तुमच्या पायाला मुलायम बनविल. 14) नारळाचे तेलाच्या सहाय्याने तुम्ही रोज़ आपल्या डोक्याची मालिश करू शकता यामुळे आपल्याला डेड्रफ त्रासापासून सुटका मिळेल. 15) जर तुम्हाला जास्त आंचेवर जेवण बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही नारळाचे तेलाचा उपयोग करू शकता. 16) नारळाचे तेल वाटरप्रूफ मस्करा दूर करण्यासाठी परिणामकारक आहे. कॉटन बॉल वरती थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि त्याने आपल्या डोळ्यावर लावलेला मेक अप साफ़ करा. यामुळे आय लाइनर किंवा काजळ न पसरविताच स्वच्छ होऊन जाईल. मेकअप साफ़ केल्यानंतर चेहरा धुवून घ्या. एका रिसर्च मध्ये हे माहिती झाले कि नारळाचे तेल शरीरास लावल्यामुळे त्वचा कधी कोरडी राहत नाही. आणि त्याचा softness नेहमी टिकून राहतो. हे एक चांगल्या लोशन चे काम करू शकते. हे त्वचा स्मूथ आणि नरम बनविते. आणि याचा सुगंध सुद्धा खूप चांगला असतो. आणखी अश्या खूप फायद्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता.

Similar products

Sorry we're currently not accepting orders