Safflower Oil ( करडई तेल )

. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात. प्राचीन काळी करडईची लागवड तिच्या बियांमधील कॅरथॅमीन हा रंजक पदार्थ मिळविण्यासाठी केली जात असे. त्याचा वापर खाद्यपदार्थांना रंग व चव येण्यासाठी करीत असत. हल्ली करडईची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. करडईच्या बियांपासून भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात. करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात. ही आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सूर्यफूल, सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासूनही मार्गारीन (एक प्रकारचे लोणी) तयार करतात.
Select Size *

Similar products