मोहरीच्या तेलाचे फायदे: १) सांधेदुखी/ हाडांचे दुखणे यासाठी फायदेशीर आताच नाही तर अगदी कित्येक वर्षांपासून मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर फायदेशीर असल्याचे सर्वांना परिचयाचे आहे. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे सांधेदुखी अथवा हाडांचे दुखणे चालू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मोहरीच्या तेलाने मालिश करा असं सांगण्यात येते. बऱ्याचदा डॉक्टरही हा सल्ला देतात. याचा हाडांना चांगलाच फायदा मिळतो. २) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. तसंच हृदय निरोगी राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपल्या शरीरात काही ना काही कारणाने अनेक विषारी पदार्थ जात असतात. पण त्याचा आपल्याला काय त्रास होतोय हे वेळेवर कळत नाही. मग अशावेळी आपण आपल्या रोजच्या जेवणात काही प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ३) त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी त्वचेतील मॉईस्चराईजर बऱ्याचदा कमी होत असते. ज्यामुळे त्वचेवरील तजेलपणा कमी झाल्याचे कळते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीच्या तेलामध्ये असणारे ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई याचे प्रमाण जास्त असल्याने तुमची त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी उपयोग होतो. काही जणांना याचा वास आवडत नाही. मात्र याचे गुणधर्म अधिक चांगले असल्याने तुम्ही किमान आंघोळीच्या आधी अर्धा तास हे तेल त्वचेला लाऊन ठेवा आणि नियमित याचा वापर केल्यास, तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. ४) हाडांच्या मजबूतीसाठी यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. तुम्ही नियमित स्वरूपात या तेलाने मालिश करत राहिल्यास, तुम्हाला हाडांची समस्या निर्माण होणार नाही. तसेच तुम्हाला सांधेदुखीचा त्रासही होणार नाही. हाडांची मजबूती तुम्हाला अनेक वर्षांसाठी हवी असेल तर तुम्ही नियमित मोहरीच्या तेलाने योग्य मसाज करून घ्या. हा मसाज किमान आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित करून घ्यायला हवा. ५) अँटिएजिंगसाठी परिणामकारक (Anti-Aging) मोहरीच्या तेलाने त्वचेला अधिक चांगले फायदे मिळतात. विशेषतः वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो. वास्तविक एका शोधानुसार मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. चेहर्यावर सुरकुत्या पडत असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. मोहरीचे तेल तुम्ही नियमित वापरून आपली त्वचा अधिक तजेलदार आणि टवटवित ठेऊ शकता. तसेच हे एक नैसर्गिक औषध असल्यामुळे याचा तुमच्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही. ६) केसांसाठी उपयोगी बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे तेवढेच चांगले फायदेही अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यासाठी उपयोग होतो. केसांची वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा - 6 फॅटी अॅसिडचा उपयोग होतो. याशिवाय यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल प्रभाव असतो जो केसातील कोंडा मिटविण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे स्काल्पमध्ये येणारी खाजेच्या समस्येपासूनही सुटका मिळते. केसांसाठी मोहरीच्या तेलाचा खूपच फायदा होतो. ७) टॅनिंग घालविण्यासाठी मोहरीच्या तेलात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून यामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिडही असल्यामुळे त्वचेवर येणारे टॅनिंग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. टॅनिंगमुळे त्वचा काळसर होते. मात्र मोहरीच्या तेलाने हा काळसरपणा काढून टाकता येतो. नियमित या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंगची समस्स्या दूर होण्यास मदत होते. ८) रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी मसाज (Massage For Proper Blood Circulation) नियमित स्वरूपात तुम्ही मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास तुमच्या शरीर