नाईट क्रीमचा वापर चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी करायचा असतो. रात्रभर चेहऱ्यावर हे क्रीम लावल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होतं. दिवसा लावण्यात येणाऱ्या डे क्रीम तुमच्या त्वचेचं धुळ, प्रदूषण, सुर्यकिरणांपासून संरक्षण करतात. मात्र नाईट क्रीममुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. दिवसभर काम करू थकल्यामुळे अथवा प्रवास केल्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. ज्यामुळे रात्री त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करून त्वचा नाईट क्रीम लावणं गरजेचं आहे. नाईट क्रीममुळे तुमच्या त्वचेला पुन्हा ऑक्सिजन आणि पोषण मिळते. ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुमची त्वचा पुन्हा मऊ आणि मुलायम दिसू लागते.