मित्राची गोष्ट

खेड्यातल्या शाळेत 90 टक्के शिकणारी मुलं ही शेतकर्‍यांची, परंतु शिकून सगळ्यांनी मोठा अधिकारी व्हावं, साहेब व्हावं, नोकरी करावी असंच सगळ्यांचं ध्येय असतं. शेती बेभरवशाची असल्यानं शेतीत करिअर करावं असं कुणालाच वाटत नाही. घरातील चांगलं शिकलेली, बुद्धिमान असणारी मुलं आपलं नशीब काढत नोकरीच्या मागं धावतात. शाळेत जास्त डोकं चालत नाही, जो अभ्यासात मागे राहतो अशी भावंडं मग शेती करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील हुशार, होतकरू तरुण नोकरीसाठी गावाबाहेर पडतात. त्यांची बुद्धिमत्ता शेतीच्या विकासात गावाच्या विकासात लागत नाही. ज्याला अभ्यासात गती नाही त्याला नाईलाजानं शेतीची कास धरावी लागते. यामुळंही शेतीचा विकास खुंटतो, शेतीत प्रगती साधत नाही. अशा पार्श्वभूमीवर एक ध्येयवेडा विद्यार्थी कसा यशस्वी होतो याची प्रेरणादायी मांडणी करणारी कादंबरी.

Only 3 left in stock Hurry up

Similar products

Sorry we're currently not accepting orders