Menu

Menu

आयुर्वेद: करोनावरील उत्तम मात्रा

आयुर्वेद हे अतिशय प्राचीन व शाश्वत असे चिकित्सा शास्त्र आहे. याचे प्रथम प्रयोजन हे ‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम् |’ म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य रक्षण हे आहे. याच करीता सर्व आचार्यांनी दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार, रसायनविधी आणि ध्यान धारणा या सर्वांचे विवेचन सर्वप्रथम केले आहे. तत्पश्चात  व्याधी व त्यांची चिकित्सा यांचे वर्णन केले आहे. 

आयुर्वेदामध्ये आजचे डेंगू, चिकणगुणिया, स्वाईन फ्लू, करोना यांसारख्या सांसर्गिक आजारांचे वर्णन आहे का ? निश्चितच आहे! आयुर्वेदात अशा व्याधींना जनपदोध्वंस व्याधी असे म्हटले जाते. 

‘प्रसंगात गात्र संस्पर्शात नि:श्वासात सहभोजनात | 

सहशय्यासनात चापि वस्त्रमाल्यानूलेपनात || 

याप्रमाणे आयुर्वेदामध्ये संसर्गजन्य व्याधींची कारणे सांगितली आहेत. एकमेकांच्या संपर्कात आल्याने, श्वासाद्वारे एकत्र भोजन केल्याने, एकत्र झोपल्याने, एकमेकाची वस्त्रे, आभूषणे व वस्तु वापरल्याने असे व्याधी पसरतात. सहसा हे वायु, जल, देश व काल यांच्यामार्फत पसरतात ज्यामुळे संपूर्ण समाज परयेणे संपूर्ण विश्व प्रभावित होते. मग यावर उपाय योजना काय? सर्वप्रथम हेतुंचा परित्याग करणे म्हणजे ज्यामुळे तो व्याधी निर्माण होतो/पसरतो ते कारण वर्ज्य करणे वा त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. तत्पश्चात  व्याधीची चिकित्सा करणे व त्याचा उपद्रव पुन्हा पुन्हा होऊ नये याकरिता औषध योजना करणे. तसेच ईतर स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्य रक्षणार्थ व व्याधी प्रतिकार क्षमता वर्धनार्थ उपाय योजना करणे. व्याधीप्रतिकार क्षमता उत्तम असल्यास कोणत्याही संसर्गाविरोधात (इन्फेक्शन) लढणे सहज शक्य होते. उदरणार्थ सध्याच्या करोंनाच्या काळात ज्यांची व्याधीप्रतिकार क्षमता उत्तम असलेल्या लोकांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसली तर व्याधी प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्यांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली, तसेच या लोकांना पोस्ट कोव्हिड अनेक उपदरवांचा सामना करावा लागला. अशी ही व्याधी प्रतिकार क्षमता आपल्या आहार-विहार, आचार-विचार यावर अवलंबून असते. नैसर्गिक औषध औषध सेवनाने अधिक सक्षम बनवू शकतो. 

आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पतींचे वर्णन आले आहे ज्यांच्या सहाय्याने व्याधीप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करतात. त्यातील काही प्रमुख वनस्पति पाहू. 

अश्वगंधा:

 शरीर बल वाढवणारी, सातही धातूंचे पोषण करणारी, शरीरातील अग्नीचे संरक्षण करणारी उत्तम रसायन औषधी! अश्वगंधा कटू वा उष्ण गऊयनांची असल्याने सर्दी, ताप, खोकला, दमा यांमध्ये उपयुक्त ठरते. कृश व दुर्बल रुग्णांमध्ये अश्वगंधासिद्ध दूध दिल्याने स्नायूबल व उत्साह वाढण्यास मदत होतो. मानसिक ताण-तणाव, खंडित व अल्प निद्रा, रक्तभार वृद्धी (BP) यामध्ये उपयोगी. याच्या नित्य सेवनाने धातूपोषण होऊन शरीर बल व पर्यायाने व्याधीप्रतिकार क्षमता वाढते.

वासा:

अडुळसा या नावाने सर्वपरिचित असलेले क्षुप वर्गातील हे औषधी द्रव्य. दमा, जुनाट खोकला, अलर्जीचा खोकला व शरीरातून होणारा अतिरिक्त रक्तस्राव यावरील हे उत्तम औषध आहे. याच्या सेवनाने छातीत साठलेला कफ पातळ होऊन बाहेर टाकण्यास मदत होते. नाकातून रक्त येणे (घोळणा फुटणे), मूळ व्याधीतून रक्त पडणे, जुलाबामध्ये रक्त जाणे यासारख्या त्रासावर हमखास गुणकारी असे हे औषध आहे. रक्तपित्त व राजयक्ष्मा (TB) याकरीता हे सर्वोत्तम औषध सांगितले आहे. औषधी योजनेत याची पाने, फुले प्रामुख्याने वापरली जातात.

यष्टीमधू: 

आवाजाला गोड बनवणारी आयुर्मान वाढवणारी, नेत्राला हितकर, अशी ही क्षुप वर्गातील वनस्पति! औषधामध्ये याचे मूळ वापरतात. शरीरातील पित्ताचे शमन करून सर्व धातूंचे पोषण करून बल वृद्धी व ओजोवृद्धी करते. वारंवार येणारा खोकला, श्वसनाचे विकार, राजयक्ष्मा (TB), रक्तपित्त यांवर गुणकारी ! याच्या नित्य सेवनाने स्वरयंत्र, मांसबल व त्वचेचा वर्ण सुधारतो.

कालमेघ:- 

यालाच मराठीत पालेकिराईत असे म्हणतात. संपूर्ण भारतात आढळणारी क्षुप वर्गातील ही वनस्पती आहे. यकृता संबंधीचे सर्व विकार, विषम ज्वर (मलेरिया, डेंग्यू, चिकून गुण्या) व पोटातील जंत यावर याचा वापर होतो. कफ-पित्ताचा नाश करून पचन शक्ति वाढवणारे व त्यांचे संरक्षण करणारे असे हे औषध आहे. चीन

गुडूची:

यालाच गुळवेल या नावाने ओळखतात. वेलीवर्गातील ही वनस्पति अतिशय झपाट्याने वाढते. औषध योजेनेकरिता याचे कांड व पत्र असे दोन्ही वापरतात. शरीरातील सातही धातूंचे बल वाढवणारे, वृद्ध, बाल, गर्भिणी अशा सर्वांना हिटकरी व सुरक्षित असलेले असे हे उत्तम रसायन औषध आहे. याचा वापर मुख्यतः ताप, संधिवात, आमवात (Rhumatoid arthritis), वातरक्त (Gout), मधुमेह, त्वचेचे विविध आजार यांमध्ये होतो. आजारानंतर येणारे दौर्बल्य दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. गुडूचीचे  सत्व व घन याचा औषधमध्ये प्रामुख्याने वापरले जाते.

हरिद्रा:

घराघरात मसल्यांचा अविभाज्य भाग असलेली असीही हरिद्रा म्हणजे हळद ! हळदीचे कंद वापरले जातात. सर्दी, खोकला, आवाज बसने याकरिता याचा काढा अथवा हळदीचे दूध दिले जाते. हळद ही उत्तमरित्या जिवाणू Antibacterial, antifungal, anti-inflammatory अशा विविध स्वरूपात अनेक प्रकारच्या infection विरोधात आपल्या शरीराचा बचाव करते. आजही जखम झाल्यावर सर्व प्रथम हळदच लावली जाते. अशा या हळदीचे योग्य मात्रेमध्ये नित्य सेवन केले असता व्याधीप्रतिकार क्षमता वाढण्यास निश्चित मदत होते.

तुलसी:

सर्वांच्याच दारोदारी असणारे अत्यंत उपयुक्त व बहूगुणकारी औषध ! क्षुप वर्गातील या वनस्पतीचे बरेच प्रकार आहेत व ते सर्व आपापल्या गुणांनी वैशिष्ट्यपूर्ण उपयोगिता दाखवतात. तुळशीची पाने, फुले, बिया, मूळ अशा सर्वच अंगाचा वापर औषध निर्मिती मध्ये केला जातो. याचा वापर प्रामुख्याने सर्दी, खोकला, दमा, वारंवार धाप लागणे, छातीत कफ होणे यासारख्या श्वसन संस्थेच्या आजारावर होतो. कफ-पित्त दोषाचा नाश करणारे वा नित्य सेवन योग्य असे हे उत्तम औषध आहे. अॅलर्जी चा सर्दी खोकला याच्या नित्य सेवनाने कमी होतो.

निंब:- 

भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळणारे वृक्ष वर्गातील हे औषध. यालाच आपण कडूनिंब या नावाने ओळखतो. औषध निर्मिती करीता याची पाने, फुले, साल वापरले जाते. रक्तशुद्धी करणारे, शरीरातील जंतुसंसर्ग कमी करणारे, पोटातील जंत, त्वचा रोग, मधुमेह, पित्ताचा त्रास यावर हमखास गुणकारी असे हे औषध आहे. याचा काढा जखम धुण्याकरीता वापरतात. तसेच दात अथवा हिरड्या सूजणे, त्यातून पू अथवा रक्त येणे, किंवा तेथील जंतूसंसर्ग असता याच्या काढयाने गुळण्या कराव्यात. त्रास कमी होतो. याचा पाला घरात जाळला असता घरातील कीटक व जंतुंचा नाश होतो. आपल्या कडू रसाने कफ व पित्त कमी करून पचन शक्ति  वाढणारे असे हे गुणकारी व बहुउपयोगी औषध आहे.

आतापर्यंत जगभरात झालेल्या संशोधनामध्ये या औषधांची करोंनामधील उपयोगिता आधुनिक निकषांवर सिद्ध झालेली आहे. यष्टीमधूमधील Glycerirhizin सार्समध्ये व्हायरस रेप्लिकेशन रोखण्यामध्ये यशस्वी सिद्ध झाले आहे. वासा मधील Vasocin हे उत्तम bronchodilator असून श्वसन संस्थेमध्ये गुंतागुंतीचे उपद्रव होण्यापासून संरक्षण करते. कालमेघाची कोव्हिड मधील उपयुक्तता सिद्ध करणारे 750 पेक्षा जास्त रिसर्च पेपर एकट्या चीनमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या व्याधीमध्ये गुळवेल, अश्वगंधा व तुलसीचा उपयोग ईमुनो मोडयूलेटर म्हणून झालेला आहे.

   म्हणूनच शाश्वत असा आयुर्वेद स्वीकारू या, व्याधीप्रतिकार क्षमता वाढवू या व निरोगी दीर्घायु जगू या !

Home
Shop
Bag