टोमॅटो चे फायदे व त्याचे औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅटो मुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.
1) कॅन्सर पासून बचाव: टोमॅटो मध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्स ची वाढ होऊन देत नाही. जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवनुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
2) रक्ताचे उचित संचार: जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून लाल गडद होईल.

3) डोळ्यांसाठी उपयुक्त: जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.
4) सांधेदुखी वर गुणकारी: टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.