नस्याच्या नियमित वापरामुळे मिळणारे फायदे :
शिर व इन्द्रियांच्या ठिकाणील वाताचे शमन होते व वाढलेल्या कफाचे शोधन होते.
उर्ध्वजत्रुगत सर्व इन्द्रिय आणि अवयवांचे बल व कार्यक्षमता वाढते.
मेंदूवरचा ताण कमी करुन त्यास पोषण मिळते.
मान व खांद्यांच्या स्नायुंना दृढ बनवते.
चेहर्याचा वर्ण व कांति सुधारते.
मुखाचे (दात, हिरड्या,जिह्वा,घसा) आरोग्य टिकवून ठेवते.
केसांचि मुळं बळकट करुन केस गळणे,तुटणे,अकाली पिकणे कमी होते.
वारंवार होणारी सर्दि, सायनस चा त्रास व त्यामुळे होणारी डोकेदुखी व चिडचिड कायमची दूर करते.
नस्याचे हे २ थेंब आरोग्याचे आपल्यासाठी सहज करण्याजोगे, सोपे, स्वस्त व बहूगुणकारी असे आयुर्वेदाच्या खजिन्यातले वरदान अाहे. आपण सर्वांनी ह्याचा उपयोग करावा व आपले आरोग्य वाढवावे.