About Vishwadhar
Vishwadhar: Online Store For Doctor
आदरणीय डॉक्टर्स,
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही आपणासाठी https://vishwadhar.com हे पोर्टल फक्त डॉक्टरांसाठी सुरू केले आहे. या पोर्टल वर रोजच्या प्रॅक्टिस मध्ये लागणारी ग्रंथोक्त तसेच प्रोप्रायटरी औषधे औषध निर्मात्याकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये उत्तम दर्जाचे औषध वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
औषधाच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी लागणारा खर्च वाढून सुद्धा मार्केटिंग, डिस्ट्रीब्यूशन कॉस्ट या ठिकाणी होणारा खर्च कमी करून, औषधांच्या किमती वाढणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे मार्केटिंगसाठी औषधाच्या किंमतीच्या 22 ते 25 टक्के खर्च हा मार्केटिंग वर होतो सध्याच्या डिजीटल युगाच्या मदतीने हा खर्च पाच टक्क्यांपर्यंत आणून त्याचा फायदा वैद्यांना करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्यायाने रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
सध्या या पोर्टल वर कोणतेही एक औषध जरी घेतले तरी कमीत कमी तीस टक्के डिस्काउंट मिळतो; तसेच या मधेच भर म्हणून पेमेंट गेटवे पार्टनर्स कडून अतिरिक्त पाच ते दहा टक्के डिस्काउंट उपलब्ध होतो.
म्हणजे साधारणता 690 चे औषध इफेक्टिवेली 450 ते 500 रुपयांमध्ये मिळते त्याचप्रमाणे फ्रीचार्ज या गेटवे वरून वैद्यांना एक महिन्याचा क्रेडिट पिरिएड पण उपलब्ध होतो.
या पोर्टलवरून ऑर्डर केल्यास सर्व औषधांच्या डिलिव्हरी मोफत केल्या जातात. त्याला कोणताही अतिरिक्त चार्ज लागत नाही.
सध्या या पोर्टलवर एकशे तीस औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पोर्टलवर उपलब्ध असणारी सर्व औषधे एफडीए प्रमाणित (FDA) जी एम पी सर्टिफाइड (GMP) आहेत.
येणाऱ्या काळामध्ये सर्वच्या सर्व 270 औषधे या पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा माणस आहे. आपल्या गरजेनुसार लागणारी सर्व नवीन औषधे सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ.
या सर्व उपक्रमा मध्ये आपला बहुमूल्य सहभाग अपेक्षित आहे. तरी पोर्टलला भेट देऊन आपला फीडबॅक द्यावा ही विनंती.